कोरोना नियंत्रणासाठी उमरेड शहरात संयुक्त कारवाई |Coronavirus| Police| Sakal Media |

2021-04-28 1,009

उमरेड (जि. नागपूर) : सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अतिवर्दळीचे ठिकाण असलेले संताजी जगनाडे चौकात मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात पोलिस प्रशासन, महसूल विभाग तसेच नगर परिषदेच्या वतीने संयुक्त कारवाईला सुरुवात झाली.
‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ अशा आशयाचे स्टिकर चिकटवलेली लाल परी चौकात आली. मात्र, लाल परीच्या चालकाने मास्क लावले नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. अर्थात ५०० रुपयांची पावती फडण्यात आली. कोरोनाच्या पहिला पर्व काहीसा शिथिल होत नाही तोच दुसरी लाट येऊन उभी ठाकली आहे. तिला उंबरठ्यापासूनच परतवून लावायची असेल तर पूर्वीसारखे नियम पाळा अशी भावना तहसीलदार प्रमोद कदम यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. (व्हिडिओ : सतीश तुळसकर)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires